तळमळ
तळमळ
तुझे सौंदर्य सखी,
मनी भावत होते|
माझे डोळे निसर्गाशी,
चाळे करत होते||
पहिला पाऊस मंदगती,
वाहे वारा हळू|
तुझ्या ओठावरती मादक,
रंग लागला चढू||
पाऊस पहिला पाहून,
झाडेही हलू लागले|
तुझ्या यौवनाला पाहून,
पाणी तोंडाशी आले||
हिरवंगार वातावरण आणि,
त्यावर ढगांचं आच्छादन|
तुला पाहून लाड कराया,
तळमळतं माझं मन||