तिळगुळ
तिळगुळ
प्रेमान हावरी म्हणाली गुळाला
मी रे तुझ्यावरती जीव टाकला
तू चिक्की व दाळीमागे लागला
वर्षभर भेटत का नाहीस रे मला
गुळ गोडीने म्हणाला हावरीला
तू साथ देतेस बाजरी भाकरीला
तरी ही हृदयात ठेवतोच ना तुला
आवर्जुन भेटतो मकरसंक्रातीला
प्रत्यक्ष देताघेता आंनद होई जिवाला
बोलूनलिहून लई बरं वाटे मनाला
आपले प्रेम माहिती आहे जगाला
मोबाईल, संगणकावर मेसेज केला
सर्वांना म्हणू तिळगुळ घ्या गोड बोला
हा प्रेमाचा संदेश देऊयात विश्वाला
