तीन मंत्र जीवनाचे
तीन मंत्र जीवनाचे
तीन माकडे तीन मंत्र
गांधीजींची तीन माकडं,
झाली जगप्रसिद्ध भारी,
यांच्यामार्फत दिली तयांनी,
जगताला शिकवण सारी.
आंधळा,मुका,बहिरा,
यांचा घातला मेळ,
दिला संदेश जगताला,
बदलाया दुराचाराचे खेळ.
नका वाईट पाहू,ठेवा नजरेमधे पवित्रता,
नका वाईट बोलू,मुखी असो गोडवा,
नका वाईट ऐकू,पडो कानी सुमधुरता,
जपावे तीन मंत्र सत्य, अहिंसा आणि समता.
सत्य ,अहिंसा, आणि समता,
हे जीवनाचे मूलाधार, जीवनाचे सार,
तीन माकडांच्या संकल्पनेतून,
गांधीजींनी शिकवला साऱ्यांना सदाचार.
