तीच वाट जुनी....
तीच वाट जुनी....
तीच वाट जुनी
ताेच रस्ता जुना
मळवला मी रस्ता
जीव माझा रमेना
तीच वाट जुनी
हाेती आळखीची
रस्त्याची पायधूळ
मला लागायची
ताेच रस्ता जुना
पेहराव बदलला
बदलली माणसं
घेतात आता बदला
ताेच रस्ता जुना
खुणावताे मला
तीच वाट जुनी
हाेताे ह्दयाचा काला
