STORYMIRROR

BABAJI HULE

Classics

3  

BABAJI HULE

Classics

ती

ती

1 min
233

जसं चांदण्यानी आकाश शोभते 

पण चंद्र एकटा शोभत नाही,

तस परिवार नावाच्या बागेत ही 

“ती ”च अस्तित्व कधी दिसतच नाही  //

 

जीवनाच्या अनमोल अभंगात 

माणूस एकटा जगत नाही,

पण अमावस्येच्या काळोखातही 

“ती “ची मात्र ओळख होतच नाही  //

 

सूर्याचे प्रखर तेज आणि चंद्राची शीतलता 

यांचा संगम जेथे पहावयासमिळतो,

परंतु रेखाटलेल्या आयुष्याच्या चित्राला

रंग भरताना “ती “कधी कोणाला दिसतच नाही  //

 

जेथे कलेची आणि शक्तीची असते देवता

तेथे कमी नसते प्रेमाची कमतरता,

शारीरिक सौदंर्याची असते ती खाण 

परंतु वसवसलेल्या नजरांना “ती “कधी जाणवलीच नाही  //

 

साबणापासून-चारचाकी पर्यंतच्या 

ओंगळवाण्या जाहिरातीतले प्रदर्शन,

पुरुषी अहंकाराचे विकृतीचे घडविते दर्शन 

परंतु “ती “ची खरी ओळख दाखवतच नाही  //

 

स्वतःच्या वाटेवरच्या काचा बनून 

रक्तबंबाळ पावलांनी लढते ती निकराचा लढा,

आपल्या वाट्याच्या अर्ध्या आभाळाकडून 

स्वप्नातल् “ती “च कोड कधी उलगडलेलंच नाही  //

 

स्वतःच्या शब्द मंत्रानी अग्नीलाही 

अंगार फुलवणाऱ्या आणि तो विझवणाऱ्या,

नैसर्गिक प्रेम नावाची देणगी लाभलेल्या 

स्त्री-पुरुष समानतेमधील “ती “कधी भेटलीच नाही  //

 

मैत्रीचं जाळं आणि भावनेचं पोळं 

याचे एकमार्गी समीकरण जुळवताना ,

नात्यातले घोळ आणि त्याचा मेळ बसवताना 

तिच्यातली “ती “कधी विसरली ते कळेलच नाही   //


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics