ती
ती
ती म्हणजे एक स्त्री
दुःख विसरण्यासाठी आणते चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा
पण त्या खळखळत्या हास्याला येतो आडवा बांध स्त्रीत्वाचा
तिच्यातील स्त्री देते तिला स्त्रीत्वाची जाण
म्हणते कमी हसायचे, कमी बोलायचे, आपला जन्म स्त्री चा , मिटाव लागतं आपल्याला ,
लाजाळूच्या पर्णा प्रमाणे
संताप येतो तिला तिच्या स्त्रीत्वाचा
वाटतं फोडून टाकावा तो बांध आणि घ्याव्या उड्या या कड्यावरून त्या कड्यावर
पण दुर्बल ठरते ती तो भक्कम बांध फोडायला
उन्मळूनचं पडते , झंझावातातल्या एखाद्या केळी प्रमाणे,
ते स्त्रीत्वाचे कवच आणखीनच जखडते, बंदिवानाच्या श्रृंखला प्रमाणे .
नाही, नाही होणार मी देवी अथवा कोणाच्यl पायांची दासी , मिळवीन अखंड अढळपद ध्रुवा सारखे
घेईन झेप या अनंत अवकाशामध्ये अन् स्वतःच्या बुद्धिमत्तेने , अन् सामर्थ्याने करेन हे जग काबीज
मी जननी या विश्वाची आणि शक्ती या पुरुषांची
मला जगायचंय एक माणूस म्हणून
केवळ एक माणूस म्हणून
फक्त एक माणूस म्हणून
