ती
ती
तिला काय वाटत.......
तिलाही वाटते कधी कधी,
सारे सारे सोडून दयावे,
झुगारून सारे पाश,
आकाशाला कवेत घ्यावे !!
तारेवरची सर्कस रोजची,
ऊर फुटेस्तोवर पळत रहावे,
रिंगमास्तर होऊन साऱ्यांना,
सळो की पळो करावे !!
तिलाही वाटते बदल व्हावे,
कधीतरी मनासारखे घडावे,
अवचित ढग दाटून यावे,
निराशेचे मळभ धुवून जावे!!
