STORYMIRROR

Shreyash Shingre

Tragedy

4  

Shreyash Shingre

Tragedy

ती सुरक्षित आहे का?

ती सुरक्षित आहे का?

1 min
1.5K


तिच्या पदरी मूल नसते म्हणून

तिला 'वांझोटी' म्हणून हिणवले जाते

केसात गुरफटलेल्या जटांसाठी तिला

'देवदासी' म्हणून सोडले जाते


पैशांच्या त्या हव्यासापोटी

तिला 'देहव्यापारात' ढकलले जाते

कधी मंदिरात प्रवेश केला म्हणून

तिला 'मंदिराबाहेर हाकलले' जाते


वंश फक्त मुलगाच वाढवतो

म्हणून 'गर्भात तिला मारले' जाते

आणि जन्मास जरी आली तरी

तिचे 'नकुशी' नाव ठेवले जाते


हुंड्याच्या त्या लोभापायी

तिला 'जिवंत जाळले' जाते

आणि पुरुषार्थ गाजवावा म्हणून

तिचे 'लैंगिक शोषण' केले जाते


पुरुषप्रधान संस्कृतीत वारंवार

तिला 'अपमानास्पद वागणूक' दिली जाते

आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला

की तिला 'पायदळी तुडवले' जाते


रोज रोज वर्तमानपत्रात

एक तरी अशी बातमी येते

आजही या जगात 'दुःशासन' जिवंत आहे

ह्याची आठवण ती करुन देते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy