ती पहिली भेट
ती पहिली भेट
तुला भेटायला केला मी 12 तास प्रवास
जेणे करून मला व्हावा तुझा सहवास
नेहमी नेहमी फोटोत पाहून झाले मी बोर
तुला आता एकदाचे पहाचे होते माझ्या सोमर
ते वाट पाहणे आता संपणार होते
कारण train आता स्टेशनवर थांबणार होते
तुला आता भेटणारच, होत होता अलगच आनंद.||ध्रु||
जीवनातली ती पहिली भेट
एकदाची झाली तूझ्या सोबत थेट
तुला बघताच मन माझे गेले हरवून
तूझ्या त्या ओल्या स्पर्शातून
तुला बघताच झाले मी स्तब्ध
म्हणून केले मी माझे डोळे बंद
तुला बघता, तो आला अलगच आनंद..||१||
मला वाटल मि एकटीच आली
बघते तर काय सर्वांनीच गर्दी केली
तेव्हा कळले की तू खरच
खूप सुंदर आहेस बघायला
कोणी तुला म्हणते सागर
तर कोणी म्हणते समुद्र
तेव्हा तुला बघता भारी झाला आनंद...||२||

