ती पहाट...
ती पहाट...
आभास चांदण्याचे मुक्त झाल्या तारका
पायवाट ही धूसर धूसर धुंद
झाली सारी वसुंधरा
लपेटून दवबिंदूंनी व्यापल्या दाही दिशा
सोनेरी किरणांचे नक्षीकाम जणू उजळावे
गाभाऱ्यातील दिव्यांच्या प्रकाशात
रमणीय आणि किमयागार
पहाट शृंगारली आज तेजोमय किरणात
सोनेरी दिवस उजाडला
प्रभूंच्या भजन-पूजेने
प्रसन्न झाली आज पहाट
