ती का रडतेय ?
ती का रडतेय ?
आज मी पहिल्यांदा बागेत गेलो
निसर्गाला बघून हसून रडलो
हळूच एक बाकेवर बसलो
फुलाच्या प्रेमात गचकन पडलो......
समोरची बाक होती खाली
क्षणात तिथे एक मुलगी आली
तिला बघून मी स्तब्धच झालो
पाहताक्षणी तिच्या प्रेमाशी जडलो.....
होती दिसायला ती गोरी चकोर
मी मात्र होतो कोळसा थोर
तरी ती माझ्या मनात उतरली
पाहताक्षणी गचकन शिरली......
तिच्याकडे मनाने बघत होतो
तिला कवितेत उतरवत होतो
शाई बनून मी लेखणीशी लढलो
मी तिच्या प्रेमात पडलो
पण.......
ती आता गोड बाहुली
अश्रूना गालावर उतरवू लागली
मनातली लेखणी मीच थांबवली
डोळ्यांनि तिरपी फिरवून पहिली
मला वाटल......
कदाचित तिला कळलंय रूप
मी तिच्याकडे पाहतोय खुप
आता मात्र पंचायत झाली
खावि लागेल भूक्या-लाथा ची थाली
मी माझे डोळे फिरवले
दुसरीकडे थोडे सरकवत नेले
आता मात्र कमाल भारी
अश्रूना ढसाळतेय अजूनही सारी.....
माझ्या मनात प्रश्न उपजला
मी का तिचा अपमान केला?
पडतेय तिचे अश्रू गालावर
माझ्या मात्र काळ्या मनावर
माझ्या मात्र काळ्या मनावर.
