ती भयानक रात्र
ती भयानक रात्र
रात्रीची वेळ होती
भयाण काळाकुट्ट अंधार होता
रातकिड्यांचा आवाज होता
सैरावैरा वादळी वारा वाहत होता
धुवादार पाऊस कोसळत होता
वहिवाटेवर मार्ग सापडत नव्हता
साचलेल्या पाण्याचा,छम छम होता
घाबरलेल्या जीवाचा,श्वास स्तब्ध होता
हृदयाचे स्पंदनात जोश होता
धुवादार पाऊस कोसळत होता
विजेच्या प्रकाशात,अदृश्य आत्मा फिरत होता
भिजलेले अंग,थरथरून
कुठे तरी अंधारात,आसरा शोधत होता
आत्म्याची प्रतिकृतीचा,भोंबावती होता
धुवादार पाऊस कोसळत होता
पाऊस कोसळत होता....
