STORYMIRROR

Rajendra Sawant

Others

3  

Rajendra Sawant

Others

आला आला श्रावण

आला आला श्रावण

1 min
125

सळसळ हिरव रान पसरले रे

वृक्ष-वेली भरभर,पाना-फुलांनी बहरूनी गेल्या रे

सुसाट वारा,सैरावैरा वाहू लागला रे

आनंद घेऊन,श्रावणमास आला रे


सरींचा पाऊस,सरसर पडू लागला रे

डोंगर नदी-नाले,दुडदुड वाहू लागल्या रे

नभात इंद्रधन्यष्याने,सौदर्याची उधळण केली रे

आनंद घेऊन,श्रावणमास आला रे


श्रावणातील सणांनी,मन प्रफुल्लीत केले रे

कोवळ्या उन्हात,पावसाने चिंब केले रे

गाई-वासरे,पशु-पक्षांनी भ्रमण केले रे

आनंद घेऊन,श्रावणमास आला रे


सृष्टीचा रचनाकार,शिल्पकार ठरला रे

काय वर्णावा,हा महिमा

सुख-दुःखाना,जिव्हाळा घेऊन आला रे

खरंच,आनंद घेऊन,श्रावणमास आला रे....


Rate this content
Log in