STORYMIRROR

Rajendra Sawant

Others

4  

Rajendra Sawant

Others

ऋणानुबंध

ऋणानुबंध

1 min
307

एका आईच्या पोटी जन्म घेऊनी

आठवणींना उजाळा देऊनी

भाऊ-बहिणीच्या,नात्यास घट्ट करोनी

रक्षा बंधन करावे,ह्या मंगल दिनी


बहिणीच्या स्नेहभाव,प्रेमात डूबूनी

तिचे संरक्षण करावे,जन्मोजन्मी

दुःखातही तिजला साथ देऊनी

रक्षा बंधन करावे,ह्या मंगल दिनी


बहीण-भाऊ ह्या,अतूट नात्यानी

जिव्हाळा द्यावा,शब्द-सुमनांनी

तिची छबी पहावी,अंतरमनातूनी

रक्षा बंधन करावे,ह्या मंगल दिनी


मांगल्य यावे तिच्या चरण स्पर्शानी

पुष्प वर्षाव करावा,चौबाजूनी

रूढी-परंपरांना,जतन करोनी

रक्षा बंधन करावे,ह्या मंगल दिनी

  

तिच्या ध्येय,निष्ठेस सार्थकी लावूनी

डोंगर,पहाडपरी पाठी उभे राहूनी

स्वप्नांना यशाचे,तिजला पंख देऊनी

रक्षा बंधन करावे,ह्या मंगल दिनी



Rate this content
Log in