माझी माय
माझी माय
कोटी कोटी जनांची तू माऊली
तुझी आम्हावर,वृक्षापरी साउली
जिज्ञाशा,संघर्ष दुनियेत तू न्हाली
माय माझी सावित्री आली
दिनदुबळ्या,कष्टकरी समाजास
आधारस्तंभाची काष्टा पडली
शिक्षणाची धुरा तीनी सांभाळली
आभाळा एवढ्या,दुःखात डुबली.. माय माझी सावित्री आली
नभात,निसर्गात मेघ गर्जना झाली
नद्यानाले,समुद्राचे,बांध फुटूनी
पहिली शिक्षिका झाली
समाजात शिक्षणाची महर्षी झाली
माय माझी सावित्री आली
उगवणारा रोजचा सूर्य मावळला
बहुसमाजाची सत्व,तत्व विखुरली
कर्मकंठांची,बोलती बंद झाली
निष्ठुर वाऱ्यालाही,स्तब्धता आली
माय माझी सावित्री आली
सकारात्मक ऊर्जा,वाहू लागली
हक्कांसाठी जागृता आली
नमन करुनी,देऊ आदरांजली
भारत देशाची,स्वरस्वती झाली
माय माझी सावित्री आली..
