STORYMIRROR

Rajendra Sawant

Fantasy

2  

Rajendra Sawant

Fantasy

मुसळधार पाऊस

मुसळधार पाऊस

1 min
94

गगनात सप्तमंडप येऊनी

आसमंतात धुके पसरूनी

डोंगरातुनी सूर्य गडप होऊनी

मुसळदार पाऊस,पडला सरींनी


धुक्यातून दिसे,सोनेरी प्रकाश

इंद्रधनुष्याची गगणभरी गवसणी

सुसाट वाऱ्याने,वृक्षवेली डोलूनी

मुसळदार पाऊस,पडला सरींनी


हिरवागार गालिचा,दिसे हर्षवधणी

पडे सूर्यकिरण,एक बाजूस दाटूनी

काळाकुट्ट अंधार,पसरे सभोवणी

मुसळदार पाऊस,पडला सरींनी


धर्तीच्या भू गर्भात,उसळी येऊनी

नटलेल्या निसर्गास,साज चढवुनी

सुमधुर आवाजात,पक्षी विहारुनी

मुसळदार पाऊस,पडला सरींनी


गार गार वाऱ्याची झुळूक येऊनी

पावसात तो निसर्ग,पूर्णतः नाहूनी

उत्साह,आनंद मनात तो रुजूनी

मुसळदार पाऊस,पडला सरींनी


नदी,नाले,ओढे,वाहे भरभरूनी

तुफान वादळाचा,प्रहार नभोवणी

ते दवबिंदू हिऱ्या-मोतीने चमकूनी

मुसळधार पाऊस,पडला सरींनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy