सलाम तिरंगा
सलाम तिरंगा
1 min
148
सलाम करू या तिरंग्याला
त्या भारत मातेला
उंच उंच ध्वज गगनी नेऊनी
राष्ट्रज्योत पेटू या..
लढतील सुपुत्र वीरजवान
विश्वासाची ढाल घेऊन
शत्रूवरती प्रहार करून
शौर्याची निर्भीड,गाणे गाऊ या
क्रांतिकारांचे धडे घेउनी
निढळ छाती,उंच फुगोनी
देशभक्तीचा नारा देऊनी
चल जवान,लढवय्या होऊ या
वादळवारा, तुफानास दूर लोटूनी
विजयाची ज्योत पेटूनी
तिरंगाच्या रंगाचा,बोध घेउनी
ध्येय मनात,ठेवू या
अन्यायाचे साखळ दोर तोडोनी
सन्मार्गाची दिशा ठरूनी
स्वातंत्र दिनी,शपथ घेउनी
भारत देशाचा,अभिमान वाढू या...
