माय मराठी
माय मराठी
1 min
172
भाषेचा गोडवा,मनी रुजला
जणू फुलांपरी अंगी,अवतरला
अ ब क डात ताल न उरला
माय मराठीने,स्वाभिमान वाढला
शब्दा-शब्दांचा खेळ रंगला
लेखणीने मात्र तो,निशब्द झाला
वळणाच्या सुंदरतेने,हर्षुन गेला
माय मराठीने,स्वाभिमान वाढला
दीर्घ,कानामात्रा,वेलांटीने उंचावला
उकार,जोड अक्षराने,थबकला
राजभाषेचा ध्वज,गगनी फडकला
माय मराठीने,स्वाभिमान वाढला
संतांच्या वाणीने,सुगंध पसरला
नातेसमंधात जिव्हाळा आला
साहित्यिक,कवींचा उमंग बहरला
माय मराठीने,स्वाभिमान वाढला..
