STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

तिची नोकरी

तिची नोकरी

1 min
26

रोजचीच धावपळ

रोजचाच दिनक्रम

धाव धाव धावूनिया

किती करावेत श्रम!!


साहेबांचा दृष्टीकोन

पूर्ण आगळावेगळा

कशासाठी हवा स्त्रीला

नोकरीधंद्याचा लळा?


 धावतपळत येती

असे रोजचा उशीर

लक्ष नसते कामात

सदा मनी भिरभिर


नित्यनव्या अडचणी

पुढे ह्यांच्या मांडलेल्या

येती रोज उशीराने

सबबीच ठरलेल्या 


घरी दारी नोकरीला

नसे महत्त्व कधीच

नित्य रजेचा आग्रह

रजा घ्यावी तिनीच


सारी झेलते आव्हाने

घरी दारी कष्ट करी

नाही इतुकेच परि

स्वप्न पदोन्नती उरी


रस्ता खाचखळग्यांचा

परि करीन मी पार

बॉस बनून राहीन

मनी मनीषा ही थोर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract