STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance Tragedy Abstract

2  

Arun V Deshpande

Romance Tragedy Abstract

तिची कहाणी

तिची कहाणी

1 min
14K


बसतो तसबिरी समोर तुझ्या | मन भटके गत क्षणात त्या ||

साथ नाही तुझी नशिबी या | अर्थ नाही उरला जगण्यात या ...||

आनंद होता सहवासात तुझ्या | जीवनबाग मस्त फुलली होती ||

मीच काय ही दुनिया सारी  | रुपास तुझ्या भुलली होती .||

मनातली जागा तुज दिली होती | तुझ्या ही मनात ती थोडी होती ||

निर्मल नाते होते मन साफ होते | घडले असते प्रमाद ते ही माफ होते ||

परकी नव्हतीच कधी म्हणून | सांगितले होते तुला कितीदा ||

कैफ चढता धुंदी त्याची बेकार | जिंकता जिंकता होते कधी हार || 

उंचीवर जाऊन वेगाने कोसळता | उभारी घेऊन पुन्हा सावरणे ||

हे काही तुला जमलेच नाही   | मिटलेले डोळे पुन्हा उघडलेच नाही ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance