STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

थोर आमुचे भाग्य

थोर आमुचे भाग्य

1 min
17.1K


आमुचे भाग्य म्हणोनि

आई जिजाऊ मिळाली आम्हा

तिच्याच पोटी राजे शिवाजी

जन्मले स्वराज्य स्थापण्याला


घोड्यावरती स्वार होऊनिया

तलवारीनेच खेळ खेळायचे

डोहाळे लागले होते जिला

भाग्य हे हिंदवी स्वराज्याचे


जुलमी सत्ता यवनांची होती

जनता बिचारी लाचार होती

अशा काळात स्वातंत्र्याची

आग ऊरात धगधगत होती


असा पुत्र जन्माला घाल प्रभू

सोडवेल जो या हिंद भूमीला

शूर प्रतापी असा पुत्र मिळवा

नित्य मागणे तिचे होते प्रभूला


शिवनेरी किल्ल्यात शिवबाला

जन्म देऊनि तिनेच वाढविला

शूरवीरांच्या गोष्टी सांगून तया

संस्कार मोलाचे दिले बाळाला


जुलमाच्या विरुद्ध मनामध्ये

चीड भरूनि वीर घडविला

"हिंदवी स्वराज्य" स्वप्न ऊरी

दाखवून घडविले शिवबाला


शूर शिवाजी राजा जन्मला

ज्या शूर अशा मातेच्या पोटी

अशा शूर आईच्या चरणी

वंदन करूया कोटी कोटी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational