थंडी
थंडी
गोठवणार्या थंडीची
मनास जाणीव होई,
अंगी येती शहारे
कुडकुड तनास होई.....
रविराजाची वाट
आतुरतेने पाही,
थंडीच्या मोसमाची
मजाच लय भारी....
त त प प बोलताना
शब्द अडकून राहतात,
थंडीतल्या गंमती
हसू ओठी फुलवतात....
शेकोटी करते कमाल
हव्याशा गरमीची,
मजाच ती ओर
रजई अन् शालीची....
ऊन ,सावलीचा हा खेळ
सदोदित चालत रहायचा,
चंचल मनात आपुलकीने
घर करून थाटायचा....
