STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Fantasy

4  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Fantasy

तहान

तहान

1 min
172

चातक पक्षास असे तहान

मृगनक्षत्राच्याच पाण्याची |

खऱ्या गायकाला असे तहान

सप्तसुरात सुरेल गाण्याची | |१| |


तहान प्रत्येकाचीच वेगवेगळी

साऱ्यांची भागेलंच असंही नाही |

पाणी जगण्यासाठी आवश्यक

साऱ्याच सजीवांस जीवनदायी | |२| |


लहान वा महान असो प्रत्येकास 

वात्सल्य व प्रेमाची असे तहान |

वाळवंटात पाण्यासाठी वणवण

कधी उंटाचा जीव पडे गहाण | |३| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract