STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational Others

4  

AnjalI Butley

Inspirational Others

तेलवात

तेलवात

1 min
244

तेलवातीच्या पणत्या पेटवुन

उजवळुन टाकते घर

मंद प्रकाशाचा घेते आनंद...


बाजारातल्या तयार फराळा पेक्षा

बनवते घरीच थोडे थोडे पदार्थ

उजळणी करते माझ्यातल्याच सुगरणीचे...


तयार कपडे विकत आणण्यापेक्षा

अडगडीतल शिवणयंत्र काढते बाहेर

शिवते माझेच मी कपडे एक-दोन...


विकतची तोरणे आणून सजावट न करता

घरच्या बागेतलीच पाने फुले वापरते तोरणाला

घरच्या घरीच करते मी माझी अरोमा थेरपी फुल पानांचे तोरण बाधतांना


विझत हळूहळु चाललेली माझ्यातल्या उर्मीची तेलवात

काजळी काढुन आनंदुन तयार करते माझ्यातच तेल

उजळवुन ठेवेल ते माझ्यातल्या सकारात्मक विचाराना, गुणाना...


दिवाळीच्या प्रकाशपर्वात मिळते बळ

तेवत ठेवण्या माझ्यातल्याच

नव नव गुणाना उजळण्यास, सुधारण्यास, नव काही शिकण्यास...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational