तेजोमय सांजवात
तेजोमय सांजवात
1 min
171
दिवेलागणी होताच
सांजवात देवापुढे
प्रकाशाने ज्योतीच्या
तेज पसरे चहूकडे (1)
मंद प्रकाशात देव्हारा
लखलखीत उजळे
हळदीकुंकू वाहूनीकरी
गृहलक्ष्मी ओवाळे (2)
शुभंकरोती म्हणूनी
विनवे देवदेवतांना
सर्वांना निरोगी ठेव
करी मनोभावे प्रार्थना (3)
सांजवात लागताच
मंगल पवित्र श्लोक
रामरक्षा भीमरुपी
संस्कार पूर्वजांचे थोर (4)
देवापाशी दीप पाहूनी
लक्ष्मी प्रवेश करी
समाधानी गृहलक्ष्मी
आनंदाच्या सरीवर सरी (5)