STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

4  

Smita Murali

Inspirational

तडजोड

तडजोड

1 min
484



तडजोड


जीवनगाणे गाता गाता

आवडते बेधूंद जगणे

नव्या दिशांना धुंडाळत

स्वप्न सोनेरी उरी जपणे


जीवनचक्राभोवती फिरते

आशा नि निराशेचे पाते

कधी होते सर्व मनाजोगे

कधी अपयश मना ग्रासते


अपेक्षाभंग झाला जीवनी

म्हणून जगणे संपत नाही

मनात ठेवून आशेचा किरण

प्रयत्नाने मिळेल सर्वकाही


परिस्थिती आणि नाती जपावी

आपणच थोडी तडजोड करावी

जीवननौका पार करण्यासाठी

सयंम नि श्रद्धेची कास धरावी


अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून

अनमोल जीवन जावू नये व्यर्थ

जमेल तेथे करुन थोडी तडजोड

क्षण आनंदाचे बनवावे सार्थ!!!


स्मिता मुराळी, सोलापूर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational