STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

सय माहेराची

सय माहेराची

1 min
14.7K


येता श्रावणाचा मास

मन हरकुन जाते.

जीव होई कासावीस

सय माहेराची येते.


नवी नवरी मी झाले

मालकिन सासरची.

परी सणा पंचमीच्या

वाट दिसे माहेरची.


उभी दारात आज मी

वाट बंधुची बघते.

असे जरी अवकाश

मन पुढेच धावते.


झूला आठवे झाडाचा

लपंडाव तो राईचा.

झिम्मा फुगडी आणि

खेळ तो भुलाबाईचा.


उफाळूनि आल्या वर

आठवणी साऱ्या खास

लागे माहेराची ओढ.

येता श्रावणाचा मास.


चिऊताई पिलां तिच्या

चारा चोचीमंदी देते.

खरं सांगू सईबाई

सय माहेराची येते.

सय माहेराची येते.

सय माहेराची येते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational