STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर

1 min
323

साधी राहणी, उच्च विचारसरणी  

प्रेमळ व नम्र स्वभाव  

सुरेल आवाजाचा पडे प्रभाव  


सरस्वती विराजे कंठात 

गुंजे नभी सप्तसूर,राग

स्वयंसिद्ध अलौकिक प्रतिभेच्या तुम्ही हो कलाकार  


दीनानाथांकडून मिळाला सुरांचा पिढीजात वारसा  

भारतीय संगीतच नाही तर 

संगीत विश्वातील तुम्ही हो आरसा


 सुप्रसिद्ध, युगप्रवर्तक,

सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका  

विश्वविख्यात प्रतिभावंत तुम्ही होत्या गायिका  

भारतरत्न, भारताची गानकोकिळा  

कठीण प्रसंगी कधी न घेतली माघार

गीत, सिनेमाच्या होत्या स्वर्ण धार  

अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित तुम्ही सप्तसूरातील मधुर सार  


"येणे जाणे तसे चाले हो निरंतर

 जाण्यास एका श्वासाचे अंतर"  

आज स्वर्गीय सूर हरपला 

 दुःखाचे सावट पसरले सर्वत्र तुमच्या जाण्याने

 भावपूर्ण श्रद्धांजली देते जड मनाने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational