स्वप्ने
स्वप्ने
आहे मी खोटारडा, काय सांगू तुला
येण्याने तूझ्या सावरलो मी, तोल मिळाला मला
काय सांगू तुला, काय सत्य नी असत्य
पूर्वजांच्या कमाईवर, जगतो सारे गत्य
सारं काही शण्ढ आहे, बाळा तूझ्या पुढे
मी असताना सोबत तूझ्या, कोणते ते संकट नढे
शब्द नाही तूझ्या साठी, की व्यक्त होईना भावना
वर्णन तूझे माझ्या डोळी, काय काय ते मावणा
वाटतं सारं सोडून पाळाव, तूझ्या मागे अगदी बाळ होऊनी
आयुष्याला तमा नसावी, सारे काम रजेवर सोडुनी
तूझ अस्तित्व सारं, काही ते सत्य आहे
माझ्या डोळ्याने मी, कायम तुझीच स्वप्ने पाहे
