स्वप्नातले घर...
स्वप्नातले घर...
मला हलकेच जाग आली,
मनात तरंग होती फुलली,
स्वप्नातल्या घरातील अंगणात ,
रांगोळी मी काढली ...
कोपरा कोपरा सजविला मी,
तुझ्या फोटोजवळ थांबली,
तु भास माझा खरा तेव्हा ,
जेव्हा श्वास श्वासांस छेडूनी गेली...
प्राजक्त सांडला अंगणात,
ओली माती गंधाळली ,
मोगरा सजला शय्येवरी ,
मी बघुनी गुलाब लाजली...
किलबील पक्ष्यांची ऐकुनी,
जाग खरी झोपेतून आली ,
स्वप्नातल्या घरात मी रमली ,
सख्या मला जाग का? आली ...

