STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

स्वप्नांच्या भिंती...

स्वप्नांच्या भिंती...

1 min
244

स्वप्नांच्या बांधल्या भिंती
मनाने सिंचता पाणी
उभारली प्रेमाची इमारत
किलबिल करीत पक्षी गाते गाणी...

सुखदुःखाची जुळवणी केली
पाई पाई जमवली थोडी
पायाभरणा करता स्वप्नांचा
वीट वीट रचली गेली ...

आजवर हृदयात भरुनी होता
बंगला साकार होताना पाहिला
डोळ्यांची पारणे फिटले नाही
वास्तु गुणगान गात राहिला ...

सुखाच्या गणरायाचा गृहप्रवेश
उगवला स्वप्नांचा दिवस
हक्काने सांगते हक्काचे घर
गृहपुजनाचा साकारला दिवस...

रिध्दी सिद्धी गुणगाण करूनी
सोनपावली लक्ष्मी आली
माझ्या भाग्याच्या लक्ष्मीने बघा
डोळ्यात भरूनी सुखाचे पाणी
साज मराठी पैठणी नेसली ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract