स्वप्नांचा पाठलाग....
स्वप्नांचा पाठलाग....
स्वप्नांचा पाठलाग करा जीव तोडून,
कल्पनाशक्तीत रमा,सचित्र उभे करून...
स्वप्नांचा पाठलाग त्याला कष्टाची जाेड,
वास्तवात जगा,नाही त्याला ताेड...
स्वप्नांचा पाठलाग स्वप्न भंगते कधी,
लागू नका तुम्ही, निरर्थक वादी...
स्वप्नांचा पाठलाग चिकाटी हवी,
स्वप्न पाहा नेहमी, नाविन्याची नवी...
