स्वच्छता अभियान
स्वच्छता अभियान
स्वच्छता आपल्या हिता
सुंदरता समाजा करिता
निरोगी सुदृढ रहाण्याला
पर्याय नाहीच स्वच्छतेला
सुका कचरा ठेवावा वेगळा
ओला बाजूला करावा गोळा
प्रचार प्रसार सरकार करी
घंटागाडी ही येते दारोदारी
स्वप्न होते थोर महापुरुषांचे
आणि राष्ट्रसंत गाडगेबाबांचे
पूर्ण करण्याचे ध्येय धरूया
निरोगी आपला देश करूया
स्वच्छतेचा हा गोवर्धन पेलवू
स्वच्छ भारत जगाला दाखवू