स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृ
स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृ
#स्त्री शक्ती
अनेक समस्यांची उकल आपल्या इतिहासात आहे...
असा सामर्थ्यवान इतिहास आपल्या महाराष्ट्राचा आहे...
स्मरण कर तू राजमाता जिजामातेचे....
किती हाल-अपेष्टा सहन केल्या,
पण सोडली नाही स्वराज्याची कास,
अनेक चढ-उतार आले आयुष्यात,
अनेक यश-अपयश आले पदरात,
पण घेतला होता एकच ध्यास,
स्वराज्य हीच त्यांची आस,
प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा
घडवले छत्रपती शिवाजी महाराज
स्वराज्य संकल्पनेची बीज,
रोवले त्यांच्या मनात,
म्हणूनच घडला आपला महाराष्ट्र🚩
आणि टिकून राहिले आपले अस्तित्व....
स्मरण कर तू सावित्रीबाईंचे....
स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रोवला,
समाजाचा रोष पदोपदी पत्करला,
अनेक संघर्षांना सामोरे जात,
नाही मानली त्यांनी हार,
घेतला होता वसा शिक्षणाचा,
धैर्य खचू न देता,
पाया रोवला स्त्री शिक्षणाचा,
म्हणूच घडल्या तुम्ही आम्ही,
चढुनी शिक्षणाची पायरी....
स्मरण कर तू राणी लक्ष्मीबाईंचे....
ब्रिटिशांविरोधात झुंजार लढत देणारी, रणांगणातील विरांगणा ती,
सामान्य घरातील असामान्य स्त्री,
पण ठरली ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’,
लढता लढता पत्करले वीरमरण,
अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची
एक अनोखी आठवण,
झाशीची राणी झाली अवघ्या विश्वात अजरामर....
त्यांच्या साहस आणि कर्तृत्वाने,
आपणास नवीन ऊर्जा मिळते,
ऐकुनी त्यांच्या शौर्याच्या गाथा,
कधीच तू थकणार नाहीस,
त्यांच्या स्फूर्तीने तू घेशील उंच भरारी,
आपल्या मराठी मातीची ओळख,
देते आपल्याला जगण्याचे बळ,
देते आपल्याला परिस्थितीसोबत
लढण्याचे बळ...
