STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

स्वातंत्र्याचा लढा..

स्वातंत्र्याचा लढा..

1 min
220

दोन दिवसांचे देशप्रेम उफाळून आपले येते

आज स्वातंत्र्याचे उत्सव साजरे झाले नसते

जर हजारो शुरवीरांनी आपले प्राण त्यागले नसते!


चलेजाव चा नारा देऊन गांधी लढले नसते

छोडो भारत म्हणत हजारो भारतीय मेले नसते

आज स्वातंत्र्याचे पर्व कधीच आले नसते!


आठवावे ते सुखदेव राजगुरू आणि भगतसिंग

इंकलाब जिंदाबाद म्हणत हसत हसत जे देशासाठी

शहीद झाले नसते तर आज स्वातंत्र्याचे पर्व कधीच आले नसते!


ब्रिटिशांना दाखवेल त्यांची जागा हे ठरवून

आपल्या मना सुभाषचंद्र बोसांनी स्थापन केली

आझाद हिंद सेना हौतात्म्य त्यांनी पत्कारले नसते तर

आज स्वातंत्र्याचे पर्व कधीच आले नसते!


वीर झाशीच्या राणीच्या तलवारीचा प्रहार

इंग्रजांविरुद्ध कहर तिने माजवला नसता

आजचा स्वातंत्र्याचा सुर्य कधीच उगवला नसता!


जालीयनवाला बाग आजही सांगतो तिच कहाणी

माझ्या भारतीयांच्या रक्ताची ती रांगोळी

प्रत्येकाची आजही ऐकु येते ती आरोळी

स्वातंत्र्याचा लढा जर कुणीही दिला नसता तर

आजचा स्वातंत्र्याचा सुर्य कधीच उगवला नसता!


वंदेमातरम, भारत माता की जय, चलेजाव,

भारत छोडो च्या नाऱ्याने जो इतिहास घडला होता

जन्मलो त्या भारतभुमीत भाग्यवान आंम्ही सारे भारतीय!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational