STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Inspirational

3  

Goraksha Karanjkar

Inspirational

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

1 min
184

आजकालची पिढी, स्वातंत्र्य म्हणजे समजते 

स्वैराचार, मनाला वाटेल तसं वागणं, उपभोग 

वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली दुसऱ्याच्या 

स्वातंत्र्याची पायमल्ली होते, काय त्याचा उपयोग 

  स्वातंत्र्य- आपल्याबरोबर दुसऱ्याच्याही 

  स्वातंत्र्याचा करावा लागतो थोडा विचार 

  कसं ही वागणं, बोलणं, कसं ही राहणं 

  असं कसं चालेल? सत्संग बुद्धीचा हवा मनी सुविचार 

माझ्या स्वातंत्र्याच्या विचारांमध्ये येत नाही ना 

दुसऱ्या च्या स्वातंत्र्यावर थोडीसुद्धा गदा 

ते उभगताना असावा थोडं मनी भान

आपल्याबरोबर दुसऱ्यास ही स्वातंत्र्य, हा विचार साधा

   जरा समजून उमजून करावा स्वतंत्र्याचा उपयोग 

   हक्कांबरोबर कर्तव्यांचा ही करावा विचार 

   धर्म,जात पात पाहू नये कोणता शेजार

   कोणास करू नये आणि आपणही होऊ नये कधी लाचार

आपणही होऊ नये कधी लाचार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational