STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

स्वातंत्र्य दिन

स्वातंत्र्य दिन

1 min
231

गगनी फडफडतो हा तिरंगा

भारत देशाची आहे शान

आज आहे स्वातंत्र्य दिन

सर्व देशात भारत महान ||


क्रांतिवीरांनी दिले बलिदान 

भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी

मिळवून दिले स्वातंत्र्य वीरांनी

 शौर्याची किर्ती किती मोठी ||


सर्व जाती-धर्माचे लोक

एकत्र नांदती या देशात

स्मरण करून शूर वीरांना

नको दंगली, नको रक्तपात ||


तीन रंगाचा तिरंगा ध्वज

 नव्या उत्साहाने फडकतो 

आजच्या दिनी भारतीय

'वंदे मातरम' गर्वाने गातो ||


आज देशावर कोरोनाचे राज्य

पाळून नियम ,करूनी लसीकरण

मिळवून सगळ्यांचे संचार स्वातंत्र्य

खडसावून सांगून लावू पळवून ||


वंदन करूया या मातेला

शपथ सर्वांनी घेऊया

रक्षण करूया भारतभूचे

एकजुटीने आपण सारे राहूया ||


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational