स्वातंत्रसैनिक
स्वातंत्रसैनिक
स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची किती गाऊ गाणी
एक नाही दोन नाही असंख्य आहेत मानी
ज्यांच्या नुसत्या उच्चाराने शुद्ध होते वाणी
हेच ते शूर वीर ज्यांनी लिहिली भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी
भारत म्हणजे बाप माझा तीच माझी आई
जिथे पाहाल तिथे दिसेल इतिहासाची ग्वाही
अशी ही भूमी माझी जणू त्यागाचीच कहाणी
जिथे दिसतं नुसतंच धाडस कुठेच नाही ग्लानी
अश्या या भूमीत माझ्या असंख्य हिरे सापडतील
शौर्य आणि बलिदानाची आठवण ते करून देतील
ज्यांच्या या त्यागामुळे आजही भारत महान आहे
असे हे शूर सेनानी भारतमातेची शान आहेत
