STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

स्वाभिमानी रमाई

स्वाभिमानी रमाई

1 min
195

रंजल्या गांजल्याची आई 

मृत्यू सत्र पाहणारी माई,

निष्ठा, त्याग, कष्टाने सावरी 

प्रेरणास्थान म्हणजे रमाई..!१! 


स्वाभिमानी पतीची 

रमा स्वाभिमानी पत्नी, 

कारुण्य उदंड मानवतेची मूर्ती 

दुःख, त्याग, भोगी यातनी..!२! 


समजुतदारपणा बाळगणारी 

दुःख त्याग कवटाळणारी, 

सहनशीलतेची शक्ती असणारी 

रमाई सर्वास सांभाळणारी..!३!


 जिद्द, आत्मविश्वासाने

संसाराचा गाडा हाकली, 

मदत केली बाबासाहेबास

ध्येय गाठण्यास वाहली..!४!


भिम आगमन होताच बंदरावर  

ललकारी समाज एकेकाळी, 

रमाई मात्र एकली उभी 

बाबासाहेबास दुरून न्याहाळी..!५!


संस्थेत किलबिलाट संपला 

न दिसली आनंदी मुले,

विचारी रमाबाई कारण 

कुठे गेली सारी पिले..!६! 


कळताच अवस्था मुलांची 

भुकेला जीव न मिळे खाण्यास,

तळमळे जीव रमाचा दुःखाने

देई होते नव्हते सोने विकण्यास..!७! 


पोटभर जेवताच चिमुकले 

पाहून आनंद त्यांचा रमा ही हसे, 

रमाबाई ते रमा आईचा प्रवास 

त्या क्षणाने जनतेत रमाई दिसे..!८!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational