सुवर्ण सकाळ (हायकू)
सुवर्ण सकाळ (हायकू)
सुवर्ण प्रभा
पसरली आभाळी
नभ तेजाळी
सूर्य किरणे
रंगवती आकाश
स्वर्ण प्रकाश
शोभे तेजस्वी
प्रतिबिंब सूर्याचे
जळात नाचे
पक्षी उडाले
भेटण्यास सूर्याला
झेप नभाला
जळ केशरी
सूर्यरंगात न्हाले
सोनेरी झाले
