STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Comedy

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Comedy

सुट्टीतील मजा

सुट्टीतील मजा

1 min
577

सुट्टीतील मजा


लागली उन्हाळी सुट्टी

जमली मित्रांची गट्टी

चोर पोलीस खेळू चला

करून कागदाची चिट्ठी


ना अभ्यास ना गृहपाठ

नाही कोणती ही सजा

खूप खेळू उड्या मारू

घेऊ चला सुट्टीतील मजा


राम्या गण्या सच्या चला

निघा घराबाहेर आत्ता

सुट्टी आपली सुरू झाली

खेळू अलबत्ता खलबत्ता


सकाळी सकाळी चला

मिळून क्रिकेट खेळू

चौकार षटकार मारू

मैदानावर खूप खूप पळू


संपला क्रिकेटचा सामना

सूर्य आला बघ डोक्यावर

दुपारची वेळ झाली आहे

उड्या मारू या पाण्यावर


पाण्यात डुबकी मारताना

एकमेकांवर उडवू पाणी 

पाण्यात खेळ खेळताना

मजेशीर गाऊ या गाणी


- नासा येवतीकर, धर्माबाद

9423625769



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy