राजा आणि पोपटीन
राजा आणि पोपटीन
एक फार मोठा राजा होता
त्याच्या राज्यात त्याचा गाजा बाजा होता...
त्याच्याकडे पाच मोठी राज्य होती
आणि ती सगळी एका साम्राज्यासाठी अविभाज्य होती....
त्याच्या महालात सगळ्यांना प्रवेश होता
अतिशय देखणा आणि सुंदर त्या राज्याचा वेश होता...
त्याची प्रजा खूप सुखी होती
फक्त त्याची पोपटीन दुखी होती....
त्या पोपटीन ला खूश करण्यासाठी त्याने तप केला
संपूर्ण एक वर्ष त्याने इंद्रदेवाचा जप केला....
इंद्रदेव प्रकट झाले म्हणाले काय लागत तुला
राजा म्हणाला फक्त खुश करा माझ्या पोपटीनला...
इंद्रदेवाने इंद्रधनुष्याचा निर्माण केला
ते बघून पोपटीन खुश झाली व राजाला आनंद झाला...
नंतर राजा आणि पोपटीन आणि प्रजा आनंदाने राहू लागली.....
