गंमतीशीर बाराखडी
गंमतीशीर बाराखडी
अ ..... अ ..... अंबा...
तो बघ लटकला वरती खंबा
आ ..... आ.... आई ....
खायला दे थोडी मलाई...
क....क.... काकू....
कापायला दे ग चाकू.....
ब......ब..... बाबा...
मी येते ना माझ्यासाठी थांबा....
आ.....आ......आजी....
कश्याची केली भाजी......
आ ....... आ...... आप्पा.....
सांगना हो परीच्या गप्पा......
त.....त .......ताई....
खायला दे न काई.....
क.......क......काका.....
शेतातून आनाना थोडा मक्का.....
म....... म...... मावशी.....
कांदा कापायला दे ग पावशी....