STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Comedy

3  

Ashok Shivram Veer

Comedy

पायीची वहाण पायीच बरी

पायीची वहाण पायीच बरी

1 min
132

चार उन्हाळे पावसाळे यांनी काय झेलले,

म्हणे अनुभवाने काळ्याचे पांढरे झाले


करी जमा अशी ही चार टवाळखोर,

यांनीच तर केले बापाला दिवाळखोर


गेले असे हे व्यसनाच्या आहारी,

शुद्धही राहिना यांना करण्यास न्याहारी


फरक समजेना यांना मातीच्या गंधाचा,

अन नाजूक कोमल फुलांच्या सुगंधाचा


बघा तोडती कसे हे अकलेचे तारे,

म्हणे भूत बाधेने फिरते गोल गोल वारे


वावटळीत येती सारी गोळा होऊनी भूते,

अन रक्षणासाठी घालती साकडे भूमाते


कडू लिंबाला म्हणे किती छान छान बोरे,

दोष देती देवा जेव्हा होईना यांना पोरे


अडाणीपणाचा कळस असा हा करी,

पायीची वहाण अशी ही पायीच बरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy