STORYMIRROR

Shubhangi M borse(pingle)✍️

Comedy Classics Inspirational

3  

Shubhangi M borse(pingle)✍️

Comedy Classics Inspirational

दिस उन्हाळ्याचे

दिस उन्हाळ्याचे

1 min
208

आला उन्हाळा उन्हाळा

आवरा झटपट बायांनो

वाळवणीचे दिस आले

चला सुगरण आयानो


आला उन्हाळा उन्हाळा

सारसामा करूया

उपवासाचे पदार्थ

चकल्या व्हेअर बनवूया


आला उन्हाळा उन्हाळा

करा पापड कूरडया

आया बाया जमा झाल्या

घाट खीसी घेऊया


आला उन्हाळा उन्हाळा

चला गोवर्या धापूया

चूलीपाशी सरपणची

सोय आज करूया


आला उन्हाळा उन्हाळा

गोधड्या शिवूया

हिवाळ्यात ऊबदार

मऊमऊ पाघरूया


आला आला उन्हाळा

सासूरवासीन बायांना

सासूबाईंचा दरारा

नाही विसावा सूनाना


आला उन्हाळा उन्हाळा

आंबा चिंचा खाऊया

 थंडगार कलिंगडचा

चला आस्वाद घेऊया



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy