STORYMIRROR

Aarya S

Comedy Fantasy Children

3  

Aarya S

Comedy Fantasy Children

ससेभाऊ

ससेभाऊ

1 min
220

ससेभाऊ किती तुम्ही 

गोरे गोरे पान, 

छोटी छोटी मान आणि 

मोठे मोठे कान 

 

गाल किती गोबरे गोबरे 

मिश्या छान छान,

शेपूट आहे चिमुकली 

डोळे लाल लाल

 

ससेभाऊ ससेभाऊ 

अंग किती मऊ मऊ, 

हिरवे हिरवे गवत आणी 

गाजर आहे तुमचा खाऊ

 

ससेभाऊ खेळायला 

माझ्या घरी याला का ?

खाऊ देईन तुम्हाला पण 

मित्र माझे व्हाल का ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy