माझ्या दोस्ता
माझ्या दोस्ता
ये माझ्या दोस्ता
खाऊ नको खस्ता
सरळ धर रस्ता
तिथं मिळंल सस्ता...
हा माझा दोस्त
आहे बघ मस्त
सारं करतो फस्त
होतो कसा सुस्त...
व्यक्ती भारदस्त
मैत्री जबरदस्त
धंदा नोंदनी दस्त
त्यावर वरदहस्त...
भेट असते दुरापास्त
आजाराने सदा त्रस्त
माझा असून त्रयस्थ
माणूस म्हणून लई मस्त...
