खरेदी
खरेदी
खरेदी मजा...!!
चला घेऊ आता
बाजारात जाता
पतीला सजा १
झाला रिकामा
नव-याचा पैसा
माल मिळे तैसा
लागूया कामा २
फराळ करु
शेव,बुंदी लाडू
मुराळी तो धाडू
येईल सरु ३
साडी पोलके
निवडू सुंदर
छानसा पदर
मूल्य मोजके ४
छोट्या मुलांना
फटाके, कपडे
खुलेल रुपडे
हाती घेताना ५
दिवाळी आली
खरेदी झुंबड
गर्दी गडबड
तयारी झाली ६
दागिने करु
सुवर्ण, चांदीचे
सुख खरेदीचे
आग्रह धरु.७
