श्रीकृष्णा
श्रीकृष्णा
1 min
227
वाट पाहे राधा रमणी ,
कोठे गुंतला आज हरी ?
चैन न तुझ्या विना ,
श्रीकृष्णा धाव लवकरी...१
गोपगोपिका जमल्या ,
सा-या येथे वृंदावनी ,
रास रचिला आवडी ,
सय तुझी दाटे मनी..!.२
सूर बासुरीचे श्रवण्या ,
अधिर गोकुळ नगरी ,
धेनू वनी बघ हंबरुनी ,
नाद पोहचला अंभरी..!!.३
यमुनाजल उसळी घेऊनी ,
पहाते तुज वरचेवरी ,
वृक्ष लता, वेली डोलूनी ,
फांद्या पसरती भूवरी..! ४
नभांगणी दिनकर,
स्तब्ध दिसे पळभर,
दर्शन घेण्या थबकला ,
बघ सृष्टीचा प्राणेश्वर..!!
