STORYMIRROR

Shobha Joshi

Comedy

3  

Shobha Joshi

Comedy

खरेदीचा मारा (मधुसिंधू काव्यरचना)

खरेदीचा मारा (मधुसिंधू काव्यरचना)

1 min
290

कधी उधार 

   खरेदीचा मारा

   बायकोचा सारा

वाहतो भार......(१)


पत्नीस येते

   खरेदी लहर

   खिशाचा बहर

शोषून घेते......(२)


मना सारखा

   तिच्या न वागतो

   खरेदी टाळतो

प्रेमा पारखा.......(३)


होते ती सुखी

   खरेदी करता

   ओझ्याने मरता

कौतुक मुखी......(४)


खरेदी मोठी

   साड्यावर साड्या

   शर्टाला या नाड्या

शब्द ना ओठी......(५)


प्रियेस रात्री

   झोपही लागली

   खरेदी जाहली

खुशीची खात्री.......(६)


सेल लागला

   खरेदी उरका

   सांगते बरका

बघा मजला.......(७)


संपले पैसे

   खरेदी तिचीच

   चूक हो माझीच

बोलते ऐसे.......(८)


नसे नाराज

   बायको लाडकी

   खरेदी थोडकी

करता आज.......(९)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy